चैत्र नवरात्रोत्सव

           ठाण्यामध्ये गेले काही वर्षापासून चैत्र नवरात्रोत्सव साजरा होऊ लागला आहे. मी दर वर्षी हा नवरात्रोत्सवला भेट देऊन येतो. ठाण्याच्या जांभळी नाक्यावर असलेल्या ग्राउंड वर अगदी मासुंदा तलावाच्या (तलाव पाळी) समोर  ह्या देवीचे आगमन होते. ह्या नवरात्रीचे वैशिष्ट्य म्हणजे ठाण्याच्या स्व. आनंद दिघे ह्यांनी चालू केलेल्या टेंभी नाक्यावरच्या देवी सारखे ह्या देवीचे रूप असते. अतिशय नाजूक आणि सुंदर अशी दिसणारी देवी बघून डोळ्याचे पारणेच फिटते. एवढे सालस आणि सुंदर रूप सारखे बघतच रहावेसे वाटते. तेथे येणारा प्रत्येकजण इतर सजावट सोडून फक्त देवीचे रूपच पाहत बसतो. येणारे प्रत्येक हात हे कॅमेरा मधून देवीचे फोटोच काढत असतात. मीही खूप वेगवेगळया अँगलने फोटो काढले.

अतिशय सुंदर रोषणाई आणि सजावटीने जांभळी नाक्याचा परिसर झगमगून उठतो. विद्युत रोषणाईने आजूबाजूची झाडे, चौक, तलाव पाळी अगदी सुंदर दिसतात. देवीच्या मंडपाची पण सजावट अगदी उत्तम केलेली असते. देवीच्या पाठीमागे सुंदर फुलांची आरास केलेली असते. चैत्र प्रतिपदेपासून चालू होणारा हा उत्सव पुढील नऊ दिवस चालतो. ठाण्यातली राजकारणी माणसे काहीतरी चांगले काम करताहेत असे वाटले.

देवीचे आणि इतर सजावटीचे काही फोटो इथे जोडत आहे.

DSCN1929
प्रवेशद्वार 
DSCN1928
चौकात केलेली विद्युत रोषणाई
DSCN1927
चौकात केलेली विद्युत रोषणाई
DSCN1915
नवचंडी यज्ञासाठी उभारलेला मंडप
DSCN1926
मैदानातील इतर सजावट आणि भाविकांची गर्दी 

DSCN1907
देवीचे आणि गोंधळीचे अतूट नाते असते.
DSCN1882
इतर सजावट 
DSCN1885
इतर सजावट
DSCN1881
देवीच्या मंडपाची आरास आणि विद्युत सजावट
DSCN1884
देवीच्या मंडपाची आरास आणि विद्युत सजावट
DSCN1890
पूजा करण्यासाठी देवीची स्थापन केलेली प्रतिमा
देवीचे मनोहर, नाजूक रूपाचे वेगवेगळया कोनातून फोटो काढायचे प्रयत्न करावे लागले कारण  देवीला पाया पडायला येणारे भक्तगण इतके होते कि त्यांच्यामुळे देवीचे फोटो काढायलाच मिळत नव्हते. खूप फोटो क्लिक केल्यावर हे मोजके काही फोटो चांगले मिळाले 

DSCN1925

DSCN1917

DSCN1918

DSCN1920

DSCN1908

DSCN1909

DSCN1897

DSCN1904

DSCN1905

DSCN1892

DSCN1895

DSCN1896

DSCN1887

DSCN1888

DSCN1886

उदे ग अंबे उदे !!!!!

CONVERSATION

2 comments:

Back
to top