लेना होगा जनम तुम कई कई बार.....

लेना होगा जनम तुम कई कई बार.....
one and only .....Dev Anand

एवर-ग्रीन देवानंदला आपल्याकडे बोलावून देवाला पण आनंद झाला असेल.
केसाचा कोंबडा पडून वेगळीच स्टाईल करणारा देवानंद
गाईड मधला राजू आणि नंतर झालेला स्वामी,
ज्वेलथीफ मधला देवानंद,
हिरापन्ना मधला फोटोग्राफर,
दम मारो दम गाणे चालू असताना बहिणीला शोधात असणारा भाऊ,
फुलों का तारों का सबका केहना है गात बहिणीची समजूत काढणारा भाऊ,
चुडी नाही है मेरा दिल है .....म्हणत मान डोलवत गाणे म्हणणारा प्रियकर
दिल आज शायर है...गम आज नगमा है म्हणत मोठ्या मिश्या लावलेला देवानंद
मेरा मन तेरा प्यासा म्हणत आरशात बघत गाणे म्हणणारा देवानंद
शोखीयोन मे घोला जाये म्हणत नशीली चाल चालणारा देवानंद
दिल का भंवर करे पुकार  म्हणत नूतन च्या मागे मागे फिरत पायऱ्या उतरणारा देवानंद
अच्छा जी मै हारी चलो मान जावोना  म्हणणाऱ्या मधुबालावर वर रागावणारा देवानंद
ये दिल ना होता बेचारा  म्हणत गाडीच्या पुढे आपल्या खास चालीत चालणारा देवानंद

अरे कितीतरी आठवणी मागे ठेवून गेला आहेस. तू दिलेले चित्रपट, तू अभिनय केलेली गाणी, कोणी कितीही बोलो आणि कितीही अपयश येऊन ही तू दिग्दर्शित आणि निर्मिती केलेले चित्रपट...कितीतरी अनमोल ठेवा तू मागे ठेवून गेला आहेस.
एकाच गोष्ट तू कधी केली नाहीस ती म्हणजे पडद्यावर कधी रडला नाहीस. जेव्हा कधी रडायचा सीन आलास की  हाताच्या ओंजळीत तू आपले तोंड लपवून घ्यायचास किंवा कॅमेरा कडे पाठ तरी फिरावायचास. रडणे कधी तुला जमलेच नाही. म्हणूनच तुला नेहमी हसतमुख चेहऱ्याचा एवर-ग्रीन कलाकार म्हणत असावे.

तुझ्या यशस्वी कारकिर्दी कडे पाहत आणि भारतीय सिनेमासाठीचे तुझे योगदान पाहून एवढेच म्हणावेसे वाटते

 अभी ना जावो छोडकर के दिल अभी भरा नाही 
अभी तो कुछ कहा नहीं
अभी तो कुछ सुना नहीं
अभी न जावो छोड़ कर
के दिल अभी भरा नहीं....

भोवरा ह्या सदाबहार कलाकाराला सलाम करतो.

CONVERSATION

8 comments:

  1. मनकल्लोळ कडून देखील ह्या सदाबहार कलाकाराला सलाम...

    ReplyDelete
  2. मनकल्लोळ कडून देखील ह्या सदाबहार कलाकाराला सलाम...

    ReplyDelete
  3. @ मनकल्लोळ
    धन्यवाद.

    ReplyDelete
  4. देव आनंद म्हणजे सदाबहार गाणी...त्याची स्टाइलच वेगळी...

    ReplyDelete
  5. राज दिलीप आणि देव.... आईच्या किंवा जरा त्याहून आधीच्या जमान्याचे कलाकार.... राज आणि दिलीप मला कधीच आवडले नाहीत. ( माफी लोक्स! ) आणि देव मात्र नेहमीच भावला. कुछ तो बात थी ! प्रामुख्याने जाणवते ते म्हणजे तो कधीच आक्रस्ताळा नव्हता. ( त्याच्या वाट्याला तसेच किरदार आले म्हणून असेल कदाचित... पण तरीही... )

    ReplyDelete
  6. काही लोकांची किंमत ते गेल्यावरच कळते. देवानंद जेव्हा गेला तेव्हाच मला कळल की तो किती थोर होता.
    त्याने केलेलं काम केवळ महान.
    त्याच्या आणि गुरुदत्त च्या दोस्तीची कहाणी सुद्धा ग्रेटच.
    लेना होगा जनम हमे..... हे माझ आवडत गण. मी ते ऑफिस च्या कार्यक्रमात म्हंटल होत. माझ्या गरोदर बायकोला डेडीकेट केलं होत.
    खरच एव्हर ग्रीन कलाकार......

    ReplyDelete
  7. काही लोकांची किंमत ते गेल्यावरच कळते. देवानंद जेव्हा गेला तेव्हाच मला कळल की तो किती थोर होता.
    त्याने केलेलं काम केवळ महान.
    त्याच्या आणि गुरुदत्त च्या दोस्तीची कहाणी सुद्धा ग्रेटच.
    लेना होगा जनम हमे..... हे माझ आवडत गण. मी ते ऑफिस च्या कार्यक्रमात म्हंटल होत. माझ्या गरोदर बायकोला डेडीकेट केलं होत.
    खरच एव्हर ग्रीन कलाकार......

    ReplyDelete

Back
to top