ठाण्यामध्ये गेले काही वर्षापासून चैत्र नवरात्रोत्सव साजरा होऊ लागला आहे. मी दर वर्षी हा नवरात्रोत्सवला भेट देऊन येतो. ठाण्याच्या जांभळी नाक्यावर असलेल्या ग्राउंड वर अगदी मासुंदा तलावाच्या (तलाव पाळी) समोर ह्या देवीचे आगमन होते. ह्या नवरात्रीचे वैशिष्ट्य म्हणजे ठाण्याच्या स्व. आनंद दिघे ह्यांनी चालू केलेल्या टेंभी नाक्यावरच्या देवी सारखे ह्या देवीचे रूप असते. अतिशय नाजूक आणि सुंदर अशी दिसणारी देवी बघून डोळ्याचे पारणेच फिटते. एवढे सालस आणि सुंदर रूप सारखे बघतच रहावेसे वाटते. तेथे येणारा प्रत्येकजण इतर सजावट सोडून फक्त देवीचे रूपच पाहत बसतो. येणारे प्रत्येक हात हे कॅमेरा मधून देवीचे फोटोच काढत असतात. मीही खूप वेगवेगळया अँगलने फोटो काढले.
अतिशय सुंदर रोषणाई आणि सजावटीने जांभळी नाक्याचा परिसर झगमगून उठतो. विद्युत रोषणाईने आजूबाजूची झाडे, चौक, तलाव पाळी अगदी सुंदर दिसतात. देवीच्या मंडपाची पण सजावट अगदी उत्तम केलेली असते. देवीच्या पाठीमागे सुंदर फुलांची आरास केलेली असते. चैत्र प्रतिपदेपासून चालू होणारा हा उत्सव पुढील नऊ दिवस चालतो. ठाण्यातली राजकारणी माणसे काहीतरी चांगले काम करताहेत असे वाटले.
देवीचे आणि इतर सजावटीचे काही फोटो इथे जोडत आहे.
देवीचे आणि इतर सजावटीचे काही फोटो इथे जोडत आहे.
| इतर सजावट |
देवीचे मनोहर, नाजूक रूपाचे वेगवेगळया कोनातून फोटो काढायचे प्रयत्न करावे लागले कारण देवीला पाया पडायला येणारे भक्तगण इतके होते कि त्यांच्यामुळे देवीचे फोटो काढायलाच मिळत नव्हते. खूप फोटो क्लिक केल्यावर हे मोजके काही फोटो चांगले मिळाले
1 Comments
ashish farach chan photos ale ahet
ReplyDelete